मंडळी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, पूरस्थिती, अतिवृष्टी यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून दरवर्षी एकदाच निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली जाते. 2024 मध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याचे अहवाल शासनाला प्राप्त झाले होते. त्यामुळे शासनाने या परिस्थितीला प्रतिसाद देत निधी मंजूर केला आणि तो जिल्हास्तरावर उपलब्ध करून दिला आहे. सध्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण सुरू आहे.
शेतकऱ्यांना दिले जाणारे नुकसान भरपाई अनुदान DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे आधार-लिंक बँक खात्यात जमा केले जाते. या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी E-kyc पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने अनुदानाची स्थिती तपासण्यासाठी विशेष वेबसाइट सुरू केली आहे. या पोर्टलवर शेतकरी किती अनुदान मिळाले, अनुदान कोणत्या बँकेत आले, आणि ईकेवायसी पूर्ण झाले आहे का याची संपूर्ण माहिती ऑनलाईन पाहू शकतात.
https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus येथे तुमचा VK क्रमांक टाकून तुम्ही नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती तपासू शकता. या पोर्टलवर तुम्हाला किती अनुदान आले आहे, ते कोणत्या बँकेत आले आहे, अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही, आणि सबसिडी खात्यात का जमा झाली नाही यासंबंधीची संपूर्ण माहिती मिळू शकते.
सध्या नुकसान भरपाईचे वितरण सुरू झाले आहे, परंतु अनेक शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांनी ईकेवायसी अद्याप पूर्ण केलेले नाही, तर काहींच्या खात्यात ईकेवायसी पूर्ण करूनही अनुदान जमा झालेले नाही.
सर्व तालुक्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याद्या उपलब्ध होताच VK क्रमांक प्राप्त होऊ शकतात, आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. VK क्रमांक आपल्या तलाठी कार्यालयातून मिळवू शकता.