मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही, त्यामुळे लाखो महिलांचे लक्ष या योजनेकडे लागले आहे. अशा परिस्थितीत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबाबत मोठा खुलासा केला आहे.
हप्ता लवकरच मिळणार – आदिती तटकरे यांची माहिती
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांना वितरित करण्यात येणार आहे. योजनेबाबत सध्या काही गैरसमज पसरवले जात आहेत, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही.
चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत असे आढळून आले होते की काही शासकीय महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे अशा लाभार्थींना तात्पुरता लाभ थांबवण्यात आला आहे. मात्र इतर पात्र महिलांना लवकरच हप्ता देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा
मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्य अहवालाबाबत विचारणा केली असून, त्यामागील कारणे शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महिला आयोगाच्या बैठकीतील निर्णय
महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीबाबतही त्यांनी भाष्य केले. काहींना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात न आल्याची बाब त्यांनी मान्य केली. बैठकीतून मिळणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल आणि आवश्यक बदलही करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतून कोणतीही वैयक्तिक टीका झालेली नाही, तसेच महिला आयोगाच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादांचा विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी झालेला नाही – अशोक ऊईके
याच वेळी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. केंद्राच्या धर्तीवर स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला आहे. आमच्या खात्याचा निधी कमी झालेला नसून, उलट तो वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणि आदिवासी विकास निधी यांच्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. निधी कुठेही कमी करण्यात आलेला नाही, असे ऊईके यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच महिलांना मिळणार असल्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच योजना बंद होणार असल्याचे जे अफवा पसरवले जात आहेत, त्या पूर्णतः चुकीच्या असून सरकार या योजनेच्या अंमलबजावणीत सातत्य ठेवणार आहे.