नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना अंतर्गत १५ लाख रुपये पर्यंत कर्ज मिळविण्याची अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत.
योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. विशेषत आर्थिकदृष्ट्या मागास घटकांपर्यंत सहाय्य पोहोचवून त्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम करणे आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे.
हे सुद्धा वाचा
योजनेची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू केलेली योजना महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.
- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन अर्जदाराला कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता, घरी बसून मोबाईलद्वारे अर्ज करता येतो. यामुळे वेळ व खर्चाची बचत होते.
- कर्ज अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा अर्जदार अर्ज केल्यानंतर कर्जाची स्थिती वेळोवेळी मोबाईलद्वारे पाहू शकतो. योजनेचे लाभ
- १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध.
- कर्जावरील व्याजाची परतफेड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत होते.
- कर्ज बिनव्याजी उपलब्ध.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशांना कर्ज मिळण्याची संधी.
- लाभार्थीने वेळेवर हप्ते भरल्यास, व्याजाची रक्कम (१२ टक्के) लाभार्थ्याच्या बँक खात्यात दरमहा जमा केली जाते. अर्ज कसा करावा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
https://udyogmahas.com या वेबसाईटवर जावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मागील तीन वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न (व्यवसाय असल्यास)
- व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र
- फोटो
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड व अन्य संबंधित कागदपत्रे
ही योजना महाराष्ट्रातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी मदत करून आर्थिक प्रगतीची दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.