नमस्कार शासनाने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा देण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आता चार दिवसांच्या आत त्यांची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध परिस्थितींमध्ये पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात येते. याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री धनंजय मुढे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार, शासनाने सहा जिल्ह्यांतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना एकूण ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. या रकमेची थेट पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि त्यांना दिवाळीच्या सणाच्या काळात आर्थिक ओझा कमी करण्यास मदत होईल.
अन्य जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत कृषी विभागाने तीन ते चार दिवसांत अंतिम निर्णय घेण्याची माहिती दिली आहे. यामध्ये सांगली व पुणे विभागाच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, जिथे पेरणी न झालेल्या सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
जिल्ह्यांची यादी
1) धाराशिव
2) आकोला
3) परभणी
4) जालना
- नागपूर
6) अमरावती
या जिल्ह्यातील सुमारे १२ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पिक विमा रक्कमेची थेट बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया त्वरित सुरू केली जात आहे.