महाराष्ट्र राज्यामध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा एक महत्वाचा टप्पा ठरताना दिसत आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. आज आपण या योजने विषयी सविस्तर माहिती बघूया.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्थिरता मिळावी, त्यांच्या दैनंदिन गरजा लवकरच पूर्ण व्हाव्यात आणि त्यांचे जीवनमान उंचावावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत अनेक महिलांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणलेले आहेत.
या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. ही रक्कम त्यांना कोणत्याही अटी व्यतिरिक्त वापरता येते. योजनेची अंमलबजावणी योग्य व्हावी यासाठी राज्य सरकारने विशेष यंत्रणा सुरू केली आहे. लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे व पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात.
ही योजना झाल्यापासून, ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते आधीच महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या एडव्हान्स पेमेंटमुळे महिलांना त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी मदत झालेली आहे. आता सर्व महिला वर्गाची नजर ही डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुका संपल्यानंतर लवकरच डिसेंबर महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आमचं सरकार हे देना बँक आहे, घेना बँक नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.