नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे सर्व वयोगटातील प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते,भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना 3 विशेष प्रकारच्या सुविधा देत असते.तुमच्या माहितीसाठी रेल्वे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना आणि 58 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना ज्येष्ठ नागरिक मानते. रेल्वे आपल्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचीही पूर्ण काळजी घेत असते.
1) ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याच्या आधारावर लोअर बर्थची सुविधा मिळते. भारतीय रेल्वेच्या काही गाड्या सोडल्या तर बहुतेक गाड्यांमध्ये दोन प्रकारचे डबे आहेत,आरक्षित व अनारक्षित.लोअर, मिडल आणि अप्पर असे तीन प्रकारचे बर्थ आहेत. आरक्षणादरम्यान, वृद्ध प्रवाशांच्या सुविधा बघितल्या तर, रेल्वे प्राधान्याच्या आधारावर लोअर बर्थचे वाटप करत असते ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ आरक्षण.महिला प्रवाशांच्या बाबतीत, ही सुविधा वयाची 45 वर्षे पूर्ण केल्यानंतरच दिली जाते.आरक्षण करताना, त्यांना संगणकाद्वारे आपोआप लोअर बर्थ वाटप केला जातो.
2) धावत्या ट्रेनमधील रिकाम्या खालच्या बर्थवर ज्येष्ठ नागरिकांचा पहिला अधिकार असतो. ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना आसन उपलब्धतेच्या आधारावर दिली जात असते.तसेच , आरक्षण करताना खालचा बर्थ उपलब्ध नसल्यास, वृद्ध प्रवासी टीटीईला भेटू शकतात व चालत्या ट्रेनमध्ये खालचा बर्थ रिक्त ठेवण्याची मागणी ते करू शकतात.
3) रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन सुरू झाल्यानंतर खालचा बर्थ रिक्त असल्यास, मध्यम किंवा वरच्या बर्थवरील ज्येष्ठ नागरिक टीटीईला ते वाटप करण्याची विनंती करू शकतात.काही औपचारिकता पूर्ण केल्यावर, TTE त्यांना बर्थचे वाटप करते.
4)स्लीपर व एसी कोचमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागांची सुविधा असते. भारतीय रेल्वेच्या आरक्षित डब्यांसह सर्व गाड्यांमध्ये, काही बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव केल्या असतात.नियमांनुसार सर्व स्लीपर कोचमध्ये सहा लोअर बर्थ आरक्षित आहेत.तर एसी 3 टायर आणि एसी 2 टायर कोचमध्ये प्रत्येकी तीन लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येतात.आवश्यकतेनुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व गर्भवती प्रवाशांनाही या सीट किंवा बर्थवर बसवले जाते.
राजधानी एक्स्प्रेस व दुरंतो एक्स्प्रेस सारख्या सर्व एसी कोच असलेल्या गाड्यांमध्ये सामान्य मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव बर्थची संख्या अधिक असते.