प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार 12000 रुपये , अर्ज कसा करायचा ?

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
student scholarship new

आज आपण बघणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांना 12000 रुपये हे कसे मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा की ऑफलाइन कोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि सरकारची कोणती योजना आहे त्यामुळे हे विद्यार्थ्यांना 12000 रुपये मिळणार आहेत

राज्यातील आर्थिक दुर्बल जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी प्रवक्त करणे या योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित न राहण्यासाठी सरकारने ही एक नवीन योजना आणलेली आहे त्या अंतर्गत स्कॉलरशिप देणार आहे त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना हे पैसे देऊन त्यांना शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.

आर्थिक दुर्बल घटक घटकातील विद्यार्थांसाठी नॅशनल मिनस् कम मेरिट स्कॉलरशिप ही योजना केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दर महिन्याला एक हजार रुपये याप्रमाणे वर्षाला १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते आहे.या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यास परीक्षा घेतली जाते.

कोणत्या विद्यार्थी अर्ज करू शकतात

उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी व पदव्युत्तर आदी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. आर्थिकदृष्ट्या कुटुंब कमकुवत असल्यास विद्यार्थी हुशार असल्यावरही तो पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी परीक्षा घेतली जाते. या योजनेचा उद्देश आहे इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करणे.

सर्वसामान्य गोरगरिब कुटुंबातील जो विद्यार्थी यासाठी पात्र होईल त्याला पुढील तीन वर्ष प्रत्येक वर्षी 12000 रुपये देण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच या पोस्टला जास्तीत शेअर करा यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा भेटू शकतो.

यासाठी पात्रता काय

या परीक्षेला बसणारा विद्यार्थी हा इयत्ता आठवीमध्ये शिकत असायला हवा. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ५० हजार पेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी सरकारी, नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकत असावा व इयत्ता सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असावा.

या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट देण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम दरमहा एक हजार याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.