मंडळी लाडकी बहिण योजनेबद्दल गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे, आणि सरकारने या योजनेत विविध महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमध्ये विशेषता योजनेच्या संकेतस्थळावर दोन नवीन बदल करण्यात आले आहेत. चला त्या बदलांबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.
लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार (GR) आता महिलांना कोणत्याही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. यानुसार ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे नाव YES या पर्यायाखाली दर्शवले जात आहे. याउलट, ज्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्या नावावर NO हा पर्याय दिसत आहे.
यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे बंद केले जातील आणि ते पैसे वसूल करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
दुसरा महत्त्वाचा बदल हा आहे की, लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत किती पैसे मिळाले, कोणत्या बॅंकेत जमा झाले, आणि कधी मिळाले याबाबत सविस्तर माहिती मिळवता येईल.
हे सर्व बदल फक्त लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. नारी शक्ती अॅपवर अद्याप असे कोणतेही बदल केले गेलेले नाहीत.
या बदलांमुळे लाडकी बहिण योजनेचा कार्यप्रवणता आणि पारदर्शकता वाढविण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.