नमस्कार मंडळी भारतात सोन्याला मिळणारी लोकप्रियता नवीन नाही, विशेषता महिलांमध्ये. आता काही दिवसांतच लग्नसराई सुरू होणार असल्यामुळे सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसतो. दिवाळीच्या हंगामातही सोन्याच्या किमती जास्त असतानाही दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. सध्या सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात घट झाली आहे. चला, आजच्या सोन्याचे दर जाणून घेऊया.
1 ग्रॅम सोन्याचा दर
8 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा दर 7,285 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅमचा दर 5,961 रुपये आहे.
10 ग्रॅम सोन्याचा दर
जर तुम्हाला 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला 72,850 रुपये मोजावे लागतील. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 79,470 रुपये द्यावे लागतील. तसेच 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 59,610 रुपये आहे.
चांदीची किंमत
सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घट पाहायला मिळाली आहे. 100 ग्रॅम चांदीचा दर 9,290 रुपये असून, 1 किलो चांदीसाठी 92,900 रुपये मोजावे लागतील. काही दिवसांपूर्वी चांदीची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक होती, परंतु आता ती 100 रुपयांनी कमी झाली आहे.
सोन्याच्या दरात घसरणीची कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. याचे मुख्य कारण अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुका आहेत, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. या निकालानंतर सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या. तसेच, अमेरिकी केंद्रीय बँकेने व्याजदरात 0.25% कपात करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मनी कंट्रोल च्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या विजयामुळे गुंतवणूकदारांचा कल जोखमीच्या संपत्तींकडे (उदा. बिटकॉइन, शेअर बाजार) वाढला असून, सोन्यातील गुंतवणुकीत घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत.