नमस्कार मित्रांनो हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील आगामी आठवड्यातील हवामानाविषयी सखोल अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या विश्लेषणानुसार सध्या राज्यात अंशता ढगाळ वातावरण दिसत असले तरी पावसाची शक्यता नाही. यामुळे शेतकऱ्यांनी चिंता न करता आपल्या शेतीच्या कामांमध्ये योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे की राज्यातील कोणत्याही विभागात पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसावर अवलंबून राहू नये. हरभरा आणि गव्हाची पेरणी करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले. तसेच पिकांना पाण्याची गरज भासल्यास पाणी देण्याचे काम त्वरित करावे, पावसाची वाट पाहण्यात वेळ घालवू नये.
ढगाळ वातावरणामुळे काही पिकांना कीड व बुरशीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या हरभरा पिकावर प्रभावी बुरशीनाशक आणि किटकनाशक फवारणी करून पिकांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. डख यांनी स्पष्ट केले की, जरी राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असले तरी पावसाची शक्यता फारशी नाही, याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण त्यानुसार पेरणी व इतर शेतीच्या कामांचे नियोजन करता येईल. पंजाबराव डख यांनी दिलेला हा अंदाज, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीविषयक निर्णयांसाठी उपयोगात आणावा.