नमस्कार केंद्र सरकारने नुकतीच उज्ज्वला 3.0 या योजनेची सुरुवात केली आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन व शेगडी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, अर्ज कसा करावा, आणि प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होते, याबद्दल सविस्तर माहिती येथे दिली आहे.
उज्ज्वला 3.0 योजनेचा लाभ कसा घ्यावा?
उज्ज्वला योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना भारत गॅस, इंडियन गॅस किंवा एचपी गॅसमधून मोफत कनेक्शन मिळते. तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज प्रक्रिया सुरू करता येईल.
उज्ज्वला गॅस नोंदणीसाठी पात्रता
- अर्जदार महिला असावी.
- वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
- महिलेच्या घरात कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे.
- सर्व वर्गातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत: अनुसूचित जाती-जमाती, प्रधानमंत्री आवास योजनेतील महिलादेखील अर्ज करू शकतात.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- केवायसी फॉर्म
- बँक पासबुक
- रेशन कार्डाची प्रत अर्ज कसा करावा?
1) प्रथम तुम्हाला भारत गॅस, इंडियन गॅस किंवा एचपी गॅसमध्ये कोणता कनेक्शन हवा ते ठरवावे. तुमच्या जवळची गॅस एजन्सी निवडणे फायदेशीर ठरते.
2) अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करून पुढे जा.
3) अर्जासाठी राज्य आणि जिल्हा निवडा.
4) तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीची निवड करा.
5) मोबाइल नंबर प्रविष्ट करा व ओटीपीद्वारे खात्री करा.
6) सर्व आवश्यक माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीकडे संपर्क साधून पुढील माहिती मिळवा. अशा प्रकारे, तुम्ही पीएम उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेऊ शकता.