तुमच्या गाडीवर असलेला दंड असा चेक करा , पहा सविस्तर माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
traffic challan check online

मित्रांनो रोडवर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असते. परंतु कधी कधी अनवधानाने नियम मोडले जातात आणि त्यामुळे दंड ठोठावला जातो. तसेच जर वाहतूक पोलीस आसपास नसले तरी रस्त्यावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तुमचे उल्लंघन नोंदवू शकतात आणि तुमच्यावर ई-चालान जारी होऊ शकते.

ई-चालान तपासण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मोबाइल ॲपवर जावे लागेल. खालील स्टेप्स फॉलो करा.

1) सर्वप्रथम तुम्ही परिवहन विभागाच्या ई-चालान वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा Maha Traffic ॲप डाउनलोड करू शकता.
2) ॲप उघडल्यावर, Online Services पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Check Challan Status निवडा.
3) त्यासाठी तुमचा वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक प्रविष्ट करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-चालान स्थिती SMS च्या माध्यमातून मिळू शकते.
4) जर तुम्हाला संदेश प्राप्त झाला नाही तर वाहन क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक वापरून तपासणी करा.
5) आवश्यक माहिती भरून Get Details बटणावर क्लिक करा.
6) तुम्हाला ई-चालानच्या संपूर्ण माहितीची तपासणी करता येईल, ज्यात किती आणि कशा प्रकाराचे दंड तुम्हाला लावले आहेत.
7) जर दंड लागले असल्यास, तुम्ही Pay Now पर्याय निवडून ऑनलाइन पेमेंट करू शकता. हे पेमेंट नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून करता येईल.

यामुळे तुम्हाला दंड तपासून त्याचे निवारण ऑनलाइन करता येईल, आणि कोर्टात जाण्याची आवश्यकता टळू शकते. ही प्रक्रिया सोपी आणि उपयुक्त आहे, त्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.