मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय : सर्व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार …

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us

मित्रांनो राज्यातील नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरातील नागरिकांना शासकीय सेवा जास्तीत जास्त मोबाईलच्या माध्यमातून सहजपणे मिळाव्यात यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय

राज्यातील विविध विभागांच्या एकूण 996 शासकीय सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये पुढील प्रकारांचा समावेश आहे.

  • आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध सेवा—536
  • संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध सेवा—90
  • सध्या ऑफलाईन सेवा—343

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व ऑफलाईन सेवा लवकरात लवकर आपले सरकार पोर्टल वर उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना 99 टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला 100 दिवसांत काम पूर्ण करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.

सेवा अधिसूचना आणि सुधारणा

ज्या सेवांची अद्याप अधिसूचना झालेली नाही, त्या तत्काळ अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. तसेच, नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.

आरोग्य विभागासाठी सूचनादेखील महत्त्वाच्या

बुलडाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकरणाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, बुरशीच्या प्रादुर्भावामुळे हा प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधित नागरिकांना औषधोपचार आणि मलम वितरित करण्यात आले असून केस गळतीच्या प्रमाणात घट झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्धा जिल्ह्यातील अशाच घटना लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले आहे.

या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.