मित्रांनो आजच्या ट्रॅफिक चालानबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे, विशेषता त्या लोकांसाठी ज्यांना चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्याची सवय आहे. अनेक लोक विचारतात की, चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड होऊ शकतो का? यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर स्पष्ट माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये मोटर वाहन कायद्यात महत्त्वाचे बदल केले होते. त्यानुसार वाहन चालवताना काही नियमांचे पालन अनिवार्य केले गेले आहे. विशेषतः बाईक चालवताना, बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते. अपघाताच्या वेळी पायाला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो, त्यामुळे वाहन चालवताना चांगले बूट किंवा सँडल घालणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक योग्य आहे.
नितीन गडकरी यांनी यावर स्पष्टपणे सांगितले की, चप्पल घालून वाहन चालवणे सुरक्षित नाही आणि यामुळे जखम होण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे वाहन चालवताना योग्य पोशाख आणि शूज घालणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.