ग्रामपंचायतीचे सर्व दाखले काढा तुमच्या मोबाईल वरून , पहा सविस्तर माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
gram panchayat certificate

मंडळी राज्यातील लाखो नागरिकांना दररोज ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. यासाठी त्यांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागते. परंतु आता हे सर्व कागदपत्रे घरबसल्या मिळणार आहेत. शासनाने यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केले आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतीची कोणतीही प्रमाणपत्रे सहजपणे मिळवता येतील.

या ॲपद्वारे कोणती प्रमाणपत्रे डाउनलोड करता येतील?

या ॲपच्या मदतीने तुम्ही खालील प्रमाणपत्रे डाउनलोड करू शकता.

  • जन्म दाखला
  • मृत्यू दाखला
  • विवाह नोंदणी दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
  • पाणीपट्टी
  • घरपट्टी
  • नमुना नंबर ८ दाखला

याशिवाय या ॲपद्वारे ग्रामपंचायतीला सूचना देखील दिल्या जाऊ शकतात आणि कर भरणा देखील केला जाऊ शकतो.

ॲप कसे डाउनलोड करावे?

1) तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून खालील लिंकवर जाऊन हे ॲप डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum&hl=en_US

2) – ॲप उघडल्यानंतर रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.

  • तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख, लिंग, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका.
  • नंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP (एक-वेळ पासवर्ड) येईल. तो OTP टाकल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
  • नोंदणीनंतर तुम्हाला एक युझर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.

3) युझर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवर ग्रामपंचायतीची कोणतीही प्रमाणपत्रे डाउनलोड करू शकता.

ही नवीन सुविधा नागरिकांसाठी मोठी सोयीस्कर ठरेल आणि त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुम्हीही हे ॲप डाउनलोड करून त्याचा फायदा घ्या!

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.