रेशनकार्ड मध्ये आता नाव जोडणे आणि नाव काढणे झाले सोपे , पहा सविस्तर माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ration card name add and remove

राशन कार्ड मध्ये तुम्हाला नाव Add करायची असेल किंवा राशन कार्ड मधून नाव कमी करायचे असेल तर आता ऑनलाईन मोबाईल मधून झटपट ही कामे आता करता येणार आहे शासनाने या संदर्भात नवीन अपडेट जाहीर केले आहे.

कुठेही फेऱ्या न मारता थेट मोबाईल मधून घरबसल्या या ठिकाणी नाव कमी करणे किंवा जोडणे हे आता होणार आहे केंद्र सरकारने या मेरा रेशन 2.0 हे ॲप्लीकेशन लॉन्च केलेला आहे या अंतर्गत विविध राशन कार्ड संदर्भातील कामे ही ऑनलाईन होणार आहे.

नाव जोडणे – कुटुंबातील सदस्यांचे नाव सहजपणे समाविष्ट करता येते

नाव काढून टाकणे – आधीच्या सदस्याचे नाव कमी करण्याची मुभा मिळते

माहितीची सुधारणा – सदस्यांची इतर वैयक्तिक माहिती अपडेट देखील करता येते

कोणत्या गोष्टी आवश्यक ?

रेशन कार्ड मध्ये अपडेट करण्यासाठी अर्ज क्रमांक नोंदणी करून मोबाईल क्रमांक व ओटीपी पडताळणीसाठी लॉगिन करून त्यानंतर रेशन कार्डच्या संबंधित जी माहिती आहे ती अपडेट करता येते.

Mera Ration 2.0 कुठे भेटेल .?

तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून हे अँप डाउनलोड करता येईल आयफोन वापरकर्ते देखील App Store मधून डाउनलोड करू शकतात.

राशन मधील अपडेटची अर्ज मंजुरी प्रक्रिया ?

App वरून केलेली विनंती संबंधित जिल्ह्याच्या अन्नपुरवठा अधिकार्‍याकडे पाठवली जाते त्यांनतर पडताळणी करून मंजूर मिळाल्यानंतर रेशन कार्ड अपडेट होईल असे हे अपडेट आहे तुम्ही प्ले स्टोअर वरून Mera Ration 2.0 हे अँप आजच डाउनलोड करा.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.