नमस्कार शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे 2000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ मिळत नाही. यामागील काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट आधार लिंक असलेल्या खात्यात जमा केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच आधार सिडींग स्टेट्स एक्टिव्ह असणे गरजेचे आहे. जर हे निकष पूर्ण नसतील, तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत.
या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 2019 पूर्वी जमीन असणे आवश्यक आहे. जर 2019 नंतर शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळू शकतो.
पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये शेतकऱ्याचा नवीन 7/12 उतारा, अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफार दस्तऐवज, मयत शेतकऱ्याच्या मृत्यूची तारीख 1 फेब्रुवारी 2024 पूर्वी असल्यास त्याचा फेरफार, तसेच फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाल्यास 2019 पूर्वी आणि नंतरच्या फेरफारांची नोंद आवश्यक आहे.
याशिवाय शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची आधार कार्डे आणि 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक सादर करावा लागतो.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र लाभ मिळवण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.