मंडळी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढत असून दुपारच्या सत्रात तापमान जास्त असल्याने शालेय वेळेत बदल करण्याची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे आणि दुपारच्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येतात.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे की, २० मार्चपासून सर्व शाळांचे वर्ग सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० या वेळेत घेतले जातील. हा निर्णय सर्व खाजगी शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शाळांना लागू असेल.
शहरातील दुपारचे तापमान सरासरी ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने सकाळच्या सत्रात शाळा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी सोयीचा ठरणार आहे. या निर्णयामुळे ०६४ शाळांमधील २ लाख ५६ हजार विद्यार्थी, त्यांचे पालक, तसेच ५५०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे.
सध्या अनेक विद्यार्थी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेत जातात. दुपारच्या उन्हामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शाळेचा वेळ बदलून सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० करण्यात आला आहे. हा निर्णय प्राथमिक शिक्षण कायद्याच्या नियमांनुसार घेण्यात आला असून, त्यासाठी शिक्षक संघटनांनीही मागणी केली होती.
काही जिल्ह्यांमध्ये १७ मार्चपासूनच हा बदल लागू केला जात आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, माध्यमिक शाळांनाही वेळेच्या बदलाचा फायदा होईल आणि अध्यापनाचा दर्जा कायम राहील. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरणार आहे.