नमस्कार मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि त्यात काही बदल करायचे असतील तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या मार्गदर्शनात रेशन कार्डमधून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कसे कमी करायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
रेशन कार्डमधील नाव कमी करण्याची प्रक्रिया
रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स अनुसरा.
1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर उघडा.
- तिथे मेरा राशन 2.2 हे एप शोधून इंस्टॉल करा.
2) एप उघडून तुमची भाषा निवडा आणि Next बटणावर क्लिक करा.
- एपच्या सुरुवातीच्या पृष्ठावर Get Started हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- Beneficiary User
- Department User
तुम्ही Beneficiary User हा पर्याय निवडा.
- आता तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- आधारशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका आणि लॉगिन करा.
- लक्षात ठेवा, रेशन कार्ड ऑनलाइन लिंक केलेले असेल तरच लॉगिन करता येईल.
3) Create MPIN या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला लक्षात राहील असा MPIN तयार करा. हा MPIN एपच्या पुढील वापरासाठी आवश्यक आहे.
4) लॉगिननंतर Manage Family Details या पर्यायावर क्लिक करा.
- रेशन कार्डवरील सर्व नावे याठिकाणी दिसतील.
- ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आहे, त्या व्यक्तीच्या Delete बटणावर क्लिक करा.
5) नाव कमी करताना तुमच्याकडे त्याचे कारण विचारले जाईल.
- योग्य कारण निवडा आणि Confirm बटणावर क्लिक करा.
6) यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल, जो टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर Your Request Successfully Submitted असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
7) History या पर्यायावर क्लिक करून तुमच्या रिक्वेस्टचा स्टेटस तपासा.
रेशन कार्ड अपडेट करण्याची ही प्रक्रिया सोपी असून तुमच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक अपडेट असणे आवश्यक आहे. तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन रेशन कार्ड असलेल्या लोकांसाठीच लागू आहे.तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी संबंधित अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा.