नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा रक्कम वितरित केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील जिल्हे व लाभार्थी
1) हिंगोली
- लाभार्थी: 3.07 लाख शेतकरी
- रक्कम: ₹150 कोटी
- महसूल मंडळे: 30
2) परभणी
- लाभार्थी: 7 लाख शेतकरी
- रक्कम: ₹350 कोटी
- महसूल मंडळे: 52
3) नांदेड
- लाभार्थी: 5 लाखांहून अधिक शेतकरी
- रक्कम: ₹500 कोटींहून अधिक
- महसूल मंडळे: 93
4) जालना
- लाभार्थी: 4.5 लाख शेतकरी
- रक्कम: ₹200 कोटींपेक्षा जास्त
- महसूल मंडळे: 42
5) यवतमाळ
- मोठ्या प्रमाणावर विमा वितरण
- महसूल मंडळे: 110 इतर जिल्ह्यांतील स्थिती
या पाच जिल्ह्यांव्यतिरिक्त, इतर जिल्ह्यांमधील वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम मिळणार आहे.
- संभाजीनगर : ₹200 कोटींपेक्षा जास्त मंजूर रक्कम
- लातूर: 60 महसूल मंडळांमध्ये वितरण
- बीड: 10 लाखांहून अधिक क्लेम; 6-7 लाख शेतकऱ्यांना रक्कम वितरित होणार विमा वितरणातील विलंबाची कारणे
विमा वितरणात उशीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्य सरकारचा विमा अनुदानाचा हिस्सा अद्याप विमा कंपन्यांकडे पोहोचलेला नाही. प्रारंभिक तारीख 2 डिसेंबर होती, जी नंतर 5 डिसेंबर आणि आता 12-13 डिसेंबर 2024 ला पुढे ढकलण्यात आली आहे.
वितरण प्रक्रियेत बदल
यावर्षीपासून पीक विम्याचे वितरण थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रक्रियेद्वारे आधार-संलग्न बँक खात्यात होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
पुढील टप्प्यातील योजना
जानेवारी 2024 पासून उर्वरित 28-29 जिल्ह्यांतील क्लेमवर विचार केला जाईल. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्यानुसार विमा रक्कम वितरित केली जाईल.
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही विमा रक्कम दिलासा ठरणार आहे. राज्य सरकारने निधी लवकर विमा कंपन्यांना दिल्यास ही प्रक्रिया अधिक वेगाने होऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल.