नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात मी आपल्यासाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलो आहे, चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वककांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना १५०० रुपये वाटप केले जातात.
राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ते मार्चपर्यंतचे २ कोटी ४१ लाख रुपये दिले आहेत. २ मे २०२५ रोजी पासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना १५०० रुपये मिळत आहेत. तर काहींना खात्यात थेट ४५०० रुपये मिळाले आहेत. काही महिलांना केवळ ५०० रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे महिना ५०० रुपये मिळाले आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया 02 मे पासून पुढील २ ते ३ दिवस सुरु राहणार आहे. या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
कोणाला मिळाले ५०० रुपये ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांना २ मे पासून सुरू झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत.
यामध्ये काही महिलांच्या खात्यात ५०० रुपये देखील जमा झालेले आहेत.राज्यात काही महिला किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे फक्त ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.
कोणाला मिळणार 4500 रुपये ?
राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसांचं निमित्त साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा एकत्रिपतपणे हप्ता जमा केला होता. मात्र, काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. या सर्व महिलांच्या बँक खात्यात सरकारने २ मे पासून थेट ४५०० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.