मित्रांनो राज्य सरकार नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व सर्व स्तरांतील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. महिला, युवक, वरिष्ठ नागरिक तसेच गरीब कुटुंबांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये लाडकी बहिण योजना ,लाडका भाऊ योजना, स्वाधार योजना व वयोश्री योजना यांचा समावेश आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठीही विशेष योजना राबवण्यात येत आहेत. शहरी व ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी सरकारने बांधकाम कामगार भांडी योजना 2024 लागू केली आहे.
योजनेचे फायदे
1) बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत.
नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यास शिक्षण शुल्क माफ.
2) कुटुंबातील सदस्यांना 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा.
3) बेघर कामगारांना प्रधानमंत्री आवास योजना व अटल आवास योजने तर्गत 4 लाखांची आर्थिक मदत.
4) कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित शिक्षण.
5) कामगारांना आरोग्य, शिक्षण, घरकुल आदींसाठी 12 सेवा.
6) स्थलांतरित कामगारांना 30 भांड्यांचा संच विनामूल्य.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
1) https://mahabocw.in/ या संकेतस्थळावर भेट द्या.
2) आवश्यक माहिती भरून, मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.
3) अर्ज जमा केल्यानंतर योजनेचा लाभ मिळेल.
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
- कामगारांनी आपल्या जिल्ह्यातील WFC कार्यालयात जाऊन अर्ज करावा. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुकची झेरॉक्स
- राशन कार्ड झेरॉक्स
- लेबर कार्ड झेरॉक्स
- 1 रुपयाचे पेमेंट पावती झेरॉक्स
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
कामगारांनी आपल्या ठेकेदाराकडून काम केल्याचे प्रमाणपत्र घेऊन ते अर्जात जोडणे आवश्यक आहे.
ही योजना बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे पात्र कामगारांनी लवकरात लवकर अर्ज करून लाभ घ्यावा.