मंडळी रिझर्व्ह बँकेने (RBI) रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. मार्च 2025 अखेरीस 50 टन सोन्याची खरेदी करण्याचे RBI चे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे रुपयाच्या किमतीतील अस्थिरतेवर नियंत्रण ठेवणे आणि चलन किमती बदलण्याचा धोका कमी करणे अपेक्षित आहे.
ऑक्टोबर 2024 पासून RBI ने सोन्याच्या खरेदीमध्ये मोठी वाढ केली आहे. भारतीय परकीय चलनाच्या साठ्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सोन्याला पाहिले जात आहे. 2024 च्या सप्टेंबर अखेर भारताचा सोन्याचा साठा विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता, ज्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबवण्यात मदत झाली आहे.
32.63 टन सोन्याची खरेदी
2024 च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान RBI ने 32.63 टन सोन्याची खरेदी केली. यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस भारताचा सोन्याचा साठा 52.67 अब्ज डॉलरवरून 65.74 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी सोन्याची खरेदी परवडणारी राहिलेली नाही. यावर मोठ्या बँका आणि संस्थांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू केली आहे, कारण सोन्यातील गुंतवणुकीला मोठा फायदा होतो. सध्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
भारतात सोन्याचा सांस्कृतिक महत्त्व
भारतामध्ये सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, आणि हे देशाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ होऊनही, लोकांची दागिन्यांची खरेदी करण्याची आवड कमी झालेली नाही. अनेक लोक सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानतात. तसेच, आगामी काळात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.