नमस्कार तरुणांसाठी व्यवसाय उभारणीसाठी एक नवी योजना सुरू करण्यात आली आहे – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला बिनव्याजी ५० लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते. या कर्जाची रक्कम कशी घ्यायची, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, याची माहिती आपण पाहू.
कर्जाची मर्यादा
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत १० लाख रुपये ते ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज पूर्णपणे बिनव्याजी असून, त्याचा उद्देश राज्यातील तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सहाय्य करणे हा आहे.
योजनेच्या तीन प्रकार
1) गट प्रकल्प
2) वैयक्तिक कर्ज
3) गट कर्ज
महाराष्ट्रातील मराठा तरुणांसाठी ही योजना उपलब्ध असून, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
अटी आणि शर्ती
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेत अर्ज केलेला नसावा.
- अर्जदारास एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, राशन कार्डची झेरॉक्स प्रत.
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र द्यावे.
- प्रस्तावित व्यवसायासाठी उद्योग आधार प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- आधार कार्ड लिंक असलेली बँक खाते झेरॉक्स.
- अर्जदार संगणक हाताळण्यास सक्षम असावा.
- अर्जदार किमान १०वी पास असावा.