मंडळी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना एकूण ₹9000 मिळाले आहेत. विरोधी पक्षांनी योजनेवर टीका करत, ती निवडणुकीनंतर बंद होईल, असे आरोप केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांसाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरूच राहील. तसेच, सरकारच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अपात्र अर्जांची पडताळणी
सध्या या योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. योजनेच्या अटींनुसार.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- सरकारी नोकरीत असलेल्या किंवा आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ नाकारण्यात येईल. अफवांना सरकारचे उत्तर
योजनेबाबत बंद होण्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही योजनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, आणि महिलांच्या कल्याणासाठीच्या इतर योजनाही चालू राहतील.
या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी मदत होत असून, राज्य सरकार महिलांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.