मंडळी रेशनकार्डधारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. रेशन कार्डाची ई-केवायसी न झाल्यास, रेशन मिळविण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे रेशन मिळण्यास अडथळा टाळण्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करा. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश रेशन वितरणात पारदर्शकता आणणे आहे, ज्यामुळे मोफत शिधा खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवता येईल.
तुमच्या रेशन कार्डाची ई-केवायसी स्थिती तपासण्यासाठी राज्य अन्न सुरक्षा पोर्टलला भेट द्या. पोर्टलवर रेशन कार्डाचा नंबर टाकल्यानंतर शिधापत्रिका केवायसी स्थिती हा पर्याय निवडा. जर ई-केवायसी पूर्ण झाले असेल, तर होय असे दिसेल, आणि न झाल्यास नाही असे दिसेल.
मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने घरबसल्या रेशन कार्डाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल, ज्यामुळे नागरिकांना रेशनिंग कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. यामुळे वेळ आणि श्रम वाचतील आणि पात्र लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे लाभ वेळेवर मिळतील. रेशन कार्डावर धान्य मिळविण्यासाठी आधार कार्डप्रमाणे केवायसी करणे अनिवार्य आहे, अन्यथा रेशन मिळणे थांबू शकते. त्यामुळे लवकरात लवकर तुमची रेशन कार्डाची ई-केवायसी पूर्ण करा.