मंडळी महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटींचा निधी मंजूर केला असून, याबाबतचा शासन निर्णय (जी.आर.) अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.
योजनेचा लाभ
सन 2022-23 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभार्थींची निवड आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे.
अनुदानाचे निकष
1) अनुसूचित जाती-जमाती, महिला, तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य.
2) ट्रॅक्टरसाठी 40% अनुदान किंवा कमाल 1 लाख रुपये (जे कमी असेल).
3) केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड (मूळ स्वरूपात).
2)बँक पासबुकची झेरॉक्स प्रत.
3)सात-बारा उतारा.
4) 7/12 उतारा आणि इतर संबंधित कागदपत्रे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1)महाडीबीटी पोर्टल वर भेट द्या https://mahadbt.gov.in
2)Farmer Login पर्याय निवडा.
3) आधार क्रमांक टाकून नोंदणी किंवा लॉगिन करा.
4) मागितलेली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.