मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही लाभार्थी असाल, तर यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा, अन्यथा योजनेपासून वंचित राहू शकता.
केंद्र सरकार शेतकर्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. ही रक्कम PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर) पद्धतीने शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक शेतकर्याच्या खात्यात दर चार महिन्यांनी 3 हप्त्यांत 2,000 रुपये जमा होतात. सध्या या योजनेत 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत, आणि शेतकर्यांना आता 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, ज्यामुळे काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात.
वंचित राहू शकणारे शेतकरी
1) PM Kisan योजनेतील लाभार्थी शेतकर्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) किंवा मोबाइल ऐपवर उपलब्ध आहे.
2) जर तुम्ही अल्पभूधारक असाल, तर जिल्हा कृषी कार्यालयाकडून भूमी अभिलेखाची पडताळणी करून घ्या. अन्यथा 19 व्या हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
3) अर्ज करताना झालेल्या कोणत्याही चुका, उदाहरणार्थ चुकीचा बँक खाते क्रमांक, तुमचा हप्ता थांबवण्यास कारणीभूत ठरू शकतात. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
ई-केवायसी कशी करा
- OTP आधारित ई-केवायसी — PM Kisan पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध.
- बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी — CSC Center/SSK वरून केली जाऊ शकते.
- फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी — मोबाइल ऐपवर उपलब्ध.
संपर्क करण्यासाठी
- PM Kisan टोल फ्री क्रमांक — 18001155266
- पीएम किसान लँडलाईन क्रमांक — 011-23381092, 011-23382401
- पीएम किसान हेल्पलाईन —155261, 18001155266
- नवीन हेल्पलाईन क्रमांक — 011-24300606
तुमचं माहिती अपडेट न करता तुम्ही 19 व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे विना विलंब सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा.