मित्रांनो लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे लाभ वितरित करण्यात आले. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यांमध्ये जमा केला जाण्याची शक्यता आहे.
काही महिलांसाठी कमी लाभ
या योजनेच्या काही लाभार्थी महिलांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. काही महिलांना यापुढे दरमहा 1500 रुपये ऐवजी केवळ 500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय का घेण्यात आला, याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
कोणत्या महिलांना मिळणार कमी लाभ?
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सध्या दरमहा 1500 रुपये दिले जातात, आणि लवकरच ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
ज्या महिला केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी किंवा राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहिण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपयेच मिळणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात, तर लाडकी बहिण योजनेतून 18,000 रुपये मिळत होते. त्यामुळे अशा महिलांना दोन्ही योजनांचा लाभ मिळू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित महिलांना आता फक्त 6,000 रुपये दरवर्षी लाडकी बहिण योजनेतून मिळतील.
केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना यापुढे कमी रक्कम मिळणार असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि न्याय्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.