इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी ! पहा सविस्तर माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
good news for 10th and 12th student

मंडळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) पुरवणी परीक्षेत यावर्षी प्रथमच नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.

या आधीपर्यंत फक्त फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच पुरवणी परीक्षेत बसण्याची परवानगी होती. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य मंडळाने ही सुविधा नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करून दिली आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती

  • नव्या खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येईल.
  • ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करावी लागणार आहे.
  • अर्ज भरण्याची मुदत १५ एप्रिल 2025 ते १५ मे 2025
  • या कालावधीत विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकतील आणि आवश्यक कागदपत्रांसह पोचपावतीची प्रिंटेड प्रत संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावी लागेल.

राज्य मंडळाने सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना विनंती केली आहे की, त्यांनी वेळेत आणि सर्व नियमांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.