नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साधण्यासाठी लाडकी बहिण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्या स्वावलंबी होऊ शकतील, असा सरकारचा हेतू आहे.
पण अलीकडे या योजनेचा गैरवापर उघडकीस आला आहे. राज्यातील तब्बल २६५२ सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा संशय असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही महिलांना भरगोस वेतन मिळत असून, सातव्या वेतन आयोगाचा लाभही त्यांना मिळत आहे, तरीही त्यांनी १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळवली आहे.
यावेळी लक्षात घेण्यासारखे म्हणजे, योजना सुरू करताना सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की सरकारी कर्मचारी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र वर्ग तीन आणि वर्ग चारच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी हा नियम तोडल्याचे समोर आले आहे.
सरकारने याची चौकशी करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने १,६०,००० कर्मचाऱ्यांचा युआयडी (UID) डेटा दिला होता. या डेटाच्या आधारावर तपास चालवण्यात आला आणि आढळले की, २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या महिलांनी गेल्या ९ महिन्यांत प्रत्येकी १३,५०० रुपये मिळवले आहेत, म्हणजे एकूण अंदाजे ३.५८ कोटी रुपयांचा गैरवापर झाला आहे.
आता सरकार या चुकीचे भांडवल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेत आहे. सामान्य प्रशासन विभाग लवकरच सर्व संबंधित शासकीय विभागांना आदेश देईल, ज्यामुळे या गैरव्यवहाराविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे.