मित्रांनो जर तुम्ही अजून तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तर ही एक उत्तम आणि शेवटची संधी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधारमधील माहिती मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली जात आहे. ही सेवा myAadhaar पोर्टलवर १४ जून २०२५ पर्यंत उपलब्ध आहे.
कशासाठी आहे ही मोफत सेवा?
UIDAI कडून दिल्या गेलेल्या या सेवा अंतर्गत तुम्ही तुमचा ओळखीचा पुरावा (PoI) आणि पत्त्याचा पुरावा (PoA) ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता. हे अपडेट पूर्णपणे मोफत आहे. मात्र १५ जून २०२५ नंतर जर आधार केंद्रावर जाऊन अपडेट केलं, तर ५० रुपये शुल्क आकारलं जाईल.
कोणत्या नागरिकांनी जरूर अपडेट करावं?
UIDAI ने विशेष आवाहन केलं आहे की, ज्यांचं आधार कार्ड १० वर्षांहून अधिक जुनं आहे आणि आजपर्यंत कधीही अपडेट केलेलं नाही, त्यांनी ही संधी वापरावी. यामुळे आधारमधील माहिती अचूक राहते आणि सरकारी योजना किंवा सेवांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येत नाही.
ऑनलाइन पद्धतीने आधार कसं अपडेट कराल?
1) https://myaadhaar.uidai.gov.in या पोर्टलवर जा.
2) तुमचा आधार क्रमांक आणि OTP वापरून लॉगिन करा.
3) वैध ओळखपत्र (PoI) आणि पत्ता पुरावा (PoA) स्कॅन करून अपलोड करा.
4) अपडेटची विनंती सबमिट करा आणि Update Request Number (URN) सुरक्षित ठेवा.
पत्ता बदलायचा असल्यास काय कराल?
- myAadhaar पोर्टलवर लॉगिन करा.
- नवीन पत्ता टाका आणि त्याचा पुरावा अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर URN मिळवा.
- अपडेट मंजूर झाल्यानंतर आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करता येईल.
महत्वाची सूचना
UIDAI ने याआधीही ही सेवा अनेकदा वाढवली होती, मात्र यावेळी १४ जून २०२५ हीच अंतिम तारीख आहे. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता आपली माहिती त्वरित अपडेट करावी.