नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांसाठी त्यांची जमीन संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सहज ऑनलाईन पाहणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र शासनाने आपले भूलेख पोर्टलद्वारे जुने फेरफार, सातबारा (7/12), खाते उतारे आणि इतर दस्तऐवज ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.
सातबारा उतारा ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. वेबसाईट उघडल्यानंतर दोन पर्याय दिसतात – लॉगिन किंवा नव्याने नोंदणी. जर तुम्ही नवीन वापरकर्ते असाल, तर New User Registration या पर्यायावर क्लिक करून तुमची माहिती भरावी लागेल. नाव, मोबाईल नंबर, ईमेल, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरल्यानंतर पासवर्ड तयार करून सबमिट केल्यास नोंदणी पूर्ण होते.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर User ID आणि Password टाकून लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर Regular Search या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेज उघडेल, जिथे कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्तऐवज आणि व्हॅल्यू यांचे पर्याय दिसतील.
त्यानंतर ज्या कार्यालयाच्या अंतर्गत हवे असलेले कागदपत्र उपलब्ध आहेत, ते कार्यालय निवडावे. 1880 पासूनच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यानंतर तुम्हाला कोणती कागदपत्रे हवी आहेत ते निवडावे. जर त्या गावाची संबंधित कागदपत्रे उपलब्ध असतील, तरच ती पाहता येतील.
शेवटी, सर्वे नंबर टाकून Search बटन दाबावे. शोध पूर्ण झाल्यावर संबंधित कागदपत्र स्क्रीनवर दिसेल, आणि ते तुम्ही पाहू किंवा डाउनलोड करू शकता.
ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी संबंधित महत्त्वाची माहिती घरबसल्या मिळवता येते. यामुळे पारंपरिक कागदपत्र गहाळ होण्याचा धोका टाळता येतो आणि आवश्यक वेळी सहज उपलब्ध होतो.