मंडळी अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदत मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे निविष्ठा अनुदान (Input Subsidy) स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मंजूर केली जाते.
जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेती आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडून शासनाकडे निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 2925.61 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी निश्चित दरानुसार बाधित शेतकऱ्यांना वितरीत केला जाणार आहे.
तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी अधिकृत शासन निर्णय येथे पाहा https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202502251728212619.pdf