मंडळी राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू केली असून सुमारे 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तपासणीत ही संख्या तब्बल 40 लाखांपर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपात्र ठरण्याची कारणे
- संजय गांधी निराधार योजना लाभार्थी – 2.30 लाख
- 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिला– 1.10 लाख
- चार किंवा अधिक वाहने असलेल्या लाभार्थी, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी, तसेच स्वेच्छेने अर्ज मागे घेणाऱ्या महिला – 1.60 लाख
- फेब्रुवारीत छाननीनंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थी – 2 लाख
- सरकारी कर्मचारी व काही दिव्यांग गटातील महिला – 2 लाख
नवीन नियम आणि ई-केवायसी बंधनकारक
आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे.
- प्रत्येक वर्षी जून महिन्यात लाभार्थी महिलांना ई-केवायसी व जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- सरकारच्या या निर्णयामुळे फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
सरकारला मोठा आर्थिक फायदा
या फेरतपासणीमुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. यामुळे इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होईल आणि सरकारी खर्चात 30 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
कुठल्या भागातील महिलांना सर्वाधिक फायदा?
- पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.
- सिंधुदुर्ग व गडचिरोलीत लाभार्थ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे.
- 30 ते 39 वयोगटातील महिलांमध्ये लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
अधिक चौकशीसाठी पात्र महिलांची पडताळणी सुरू
अर्जामध्ये नोंदवलेली माहिती आणि बँक खात्यात जमा झालेले पैसे यामध्ये विसंगती आढळल्यास त्या महिलांची जिल्हास्तरीय फेरतपासणी केली जाणार आहे. आधार कार्ड योजनेशी लिंक नसलेल्या महिलांनाही अपात्र ठरवले जाणार आहे.
सरकारचा उद्देश – लाभ फक्त पात्र महिलांना
या नव्या निर्णयामुळे सरकारला निधीची बचत तर होईलच, पण योजनेंतर्गत गरजू आणि पात्र महिलांनाच योग्य लाभ मिळेल, हे सुनिश्चित केले जाणार आहे.