नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होती. यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून महिलांच्या बँक खात्यात या महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे अनेक महिलांना मोठा आधार मिळालेला आहे.
सरकारने ९४५ कोटी रुपये वाचवले
काही महिला अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत होत्या, असे शासनाच्या लक्षात आले. पडताळणीदरम्यान अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यामुळे सरकारने ९४५ कोटी रुपये वाचवले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या नेतृत्वाखालील महिला आणि बालविकास विभागाला ३,४९० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामुळे योग्य लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता सहज मिळत राहील.
राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार सुमारे ५ लाख महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळले आहे. जानेवारी अखेर लाभार्थी महिलांची संख्या २.४१ कोटीवर आली होती. फेब्रुवारी महिन्यात आणखी काही महिलांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे.
अपात्र महिलांना हप्ता मिळणार नाही
कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तरीही, काही अपात्र महिलांना मासिक १,५०० रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला होता. महिला आणि बालविकास विभागाने यावर पडताळणी केल्यानंतर अशा महिलांना पुढील हप्ता देण्यात येणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, अपात्र महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यामुळे या योजनेच्या नियमांनुसार फक्त पात्र महिलांनाच पुढे हप्ता मिळत राहील.
ही योजना महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योग्य पात्रता असलेल्या महिलांना याचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे.