मंडळी बर्याच लोकांना नोकरी करण्याची इच्छा असते, तर काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. पण भांडवलाच्या अभावामुळे अनेकांना व्यवसाय सुरू करता येत नाही. जर तुम्हीही पैशांअभावी व्यवसाय सुरू करू शकत नसाल, तर सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन (PMMY) योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कमी व्याजदरावर सहज कर्ज उपलब्ध होते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना भारत सरकारने २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक सहाय्य पुरवणे. या योजनेअंतर्गत बिगर-शेती व बिगर-कॉर्पोरेट व्यवसायांसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
ही योजना तीन स्तरांमध्ये विभागली गेली आहे, ज्याद्वारे व्यवसायाच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते. शिशु लोनअंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. किशोर लोनअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, तर तरुण लोनअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते.
या योजनेअंतर्गत कर्जाचे व्याजदर साधारणतः ९% ते १२% दरम्यान असतात. विशेष म्हणजे या कर्जासाठी कोणतेही अतिरिक्त प्रक्रिया शुल्क लागत नाही. परतफेडीचा कालावधी कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतो.
या योजनेचे प्रमुख फायदे म्हणजे कमी व्याजदर, छोटे व मध्यम उद्योगांना चालना, हमीशिवाय कर्ज आणि सोपी प्रक्रिया.
जर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल आणि भांडवलाची समस्या असेल, तर प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या बँकेत संपर्क साधा आणि तुमच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करा.