लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली , फक्त याच महिलांना मिळणार समोरचा हप्ता …….

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ladki bahin installment next month

मित्रांनो महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने १,५०० रुपयांची भेट दिली असून, राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

बऱ्याच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. मात्र दुसरीकडे मार्च महिन्याची रक्कम कधी जमा होणार, हे संबंधित अधिकाऱ्यांनाही खात्रीशीर सांगता येत नाही.

महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. फक्त १,५०० मिळतील की २,१००, याबाबत शंका वर्तवली जात होती. अखेर महिला दिनाचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करण्यास सुरुवात झाल्याने लाडक्या बहिणींनाही दिलासा मिळाला आहे.

इतर योजनांमधून लाभ घेतला जात असेल तर अथवा जास्त उत्पन्न असेल तर त्यातून लाभार्थी नावे वगळली जाणार आहेत. मात्र अंगणवाडी सेविकांनी सर्व्हे करण्यास नकार दिल्याने यापुढे प्रश्न तयार झाले आहेत.

या महिलांनी नाकारला लाभ

निवडणूक पूर्वकाळात दिवाळीच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना कोट्यवधी रुपये दिल्याने सरकारी तिजोरीवर ताण आल्याचा दावा राज्यातील विरोधी पक्षांनी केला होता.

दोन महिन्यांपासून खात्यावर पैसे जमा होत नसल्याने योजनेबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यातच अनेक बहिणींच्या मदतीला कात्री लागणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोणत्या बहिणींना यातून वगळायचे, यासाठी सर्व्हेच झाला नसल्याने काही महिलांचीच नावे यातून वगळण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नावावर कार असेल तर लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वेक्षण झाल्यानंतर या बहिणी त्यातून बाहेर पडतील.

मार्चचा हप्ता केव्हा ?

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाला म्हणजेच 08 मार्च ला जमा झाला. मात्र त्यानंतरचा हप्ता कधी जमा होईल, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अथवा सूचना आलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता याच महिन्यात मिळेल की पुढच्या महिन्यात, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

आधार लिंक अपडेट

याआधीच लाभार्थी महिलांचे आधार लिंक असल्याने आधार लिंक नाही म्हणून खात्यात पैसे जमा नाही, अशी परिस्थिती आता येणार नाही.

आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही सूट

ज्या महिला आपल्या उत्पन्नाचे विवरणपत्र भरत असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्यांची नावेही यातून कमी होणार आहेत. ज्यांच्या नावावर चारचाकी गाडी असेल त्यांचेही नावे चौकशी झाल्यावर कमी होणार असल्याची माहिती आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.