आजच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत एक मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. काल सोन्याच्या दरात काही प्रमाणात किंचित घट झाली होती, पण आज त्यात पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,024 डॉलर पर्यंत पोहोचली असून, हा एक नवीन उच्चांक आहे.
देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत, जिथे MCX वर सोन्याचे दर 88,418 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. या वर्षात सोन्याच्या किंमतीत 14% ने वाढ झाली आहे, तर मागील वर्षी यामध्ये 35% वाढ झाली होती.
सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका व चीनमधील वाढते व्यापार तणाव व जागतिक अनिश्चितता, यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढलेली आहे.
अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार आता सोन्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. महागाईच्या काळात देखील सोन्याला सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून बघितले जात आहे.
सोन्याचा दर कसा ठरतो ?
सोन्याचा दर ठरवण्यासाठी विविध घटक व प्रक्रिया समाविष्ट असतात. जागतिक व स्थानिक बाजारातील अनियमिततेमुळे व विविध आर्थिक घटकांमुळे दर दररोज बदलतात.
खालील प्रमुख कारणे व प्रक्रिया सोन्याच्या दर ठरवण्यासाठी महत्त्वाचे असतात
1) आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी व पुरवठा सोन्याच्या दरावर सर्वात मोठा प्रभाव जागतिक बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा असतो. जर सोन्याची मागणी जास्त असेल व पुरवठा कमी असेल, तर दर वाढतात. जागतिक बाजारात मोठे घटक, जसे की अमेरिका, भारत, चीन, व युरोपमध्ये सोन्याचा वापर वाढणे किंवा कमी होणे याचा थेट परिणाम दरावर होतो.
2) डॉलरची किंमत
सोनं हे अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार करतं, म्हणून डॉलरच्या किंमतीत होणारे बदल सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असतात. जर डॉलरच्या किंमतीत घट झाली, तर सोन्याचे दर वाढतात, कारण डॉलरची कमजोरी गुंतवणूकदारांना सोन्याकडे आकर्षित करते.
3) आर्थिक आणि राजकीय अनिश्चितता
सोनं एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. म्हणून, जागतिक अनिश्चितता, जसे की युद्ध, आर्थिक मंदी, किंवा राजकीय संकटं, यामुळे सोन्याची मागणी वाढू शकते.या घटनांचा प्रभाव सोन्याच्या दरांवर दिसून येतो.
4) महागाई दर
महागाई दर वाढल्यावर, लोक त्यांच्या संपत्तीला संरक्षण देण्यासाठी सोनं खरेदी करत असतात. सोनं महागाईच्या काळात एक स्थिर मूल्य मानलं जातं, ज्यामुळे त्याची मागणी व दर वाढतात.
5) सोन उत्पादन
सोन्याच्या खाणींमधून मिळणारे उत्पादनदेखील दरावर प्रभाव टाकते. जेव्हा सोन्याचे उत्पादन कमी होईल, तेव्हा त्याची किंमत वाढू शकते.
6) भारतीय सराफा बाजाराचा प्रभाव
भारत हा सोन्याचा एक महत्त्वाचा बाजार आहे, देशात सोन्याची मागणी दरावर प्रभाव टाकते. लग्नाच्या सिझनमध्ये किंवा इतर सांस्कृतिक सणांमध्ये सोन्याची खरेदी वाढते, ज्यामुळे देशातील बाजारपेठेतील दरामध्ये बदल होतो.
आजचे सोन्याचे दर
10 ग्रॅम 24 कॅरेट – 90,000 रुपये (440 रुपये वाढ)
10 ग्रॅम 22 कॅरेट – 82,500 रुपये (400 रुपये घट)
10 ग्रॅम 18 कॅरेट – 67,500 रुपये (320 रुपये वाढ)
1 ग्रॅम सोन्याचे दर
22 कॅरेट – 8,250 रुपये
24 कॅरेट – 9,000 रुपये
18 कॅरेट – 6,750 रुपये
8 ग्रॅम सोन्याचे दर
22 कॅरेट – 66,000 रुपये
24 कॅरेट – 72,000 रुपये
18 कॅरेट – 54,000 रुपये
मुंबई व पुण्यात सोन्याचे दर
22 कॅरेट – 82,500 रुपये
24 कॅरेट – 90,000 रुपये
18 कॅरेट – 67,500 रुपये या बदललेल्या दरांचा विचार करून, सोनं खरेदी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.