मंडळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. गरीब नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे, यासाठी शासन आर्थिक सहाय्य प्रदान करते. मात्र सध्या मिळणारे अनुदान अपुरे असल्याने अनेक लोकप्रतिनिधी या अनुदानात वाढ करण्याची मागणी करत आहेत.
घरकुल अनुदानात वाढ – नवीन घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत घरकुल अनुदानात ₹50,000 वाढ करण्याची घोषणा केली आहे. या वाढीबाबत येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे घर बांधणीचा खर्च वाढत असल्याने सरकारने हे अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याचे घरकुल अनुदान आणि हप्त्यांचे विभाजन
सध्या मंजूर असलेल्या घरकुल योजनेंतर्गत ₹1,20,000 अनुदान दिले जाते. हे अनुदान चार हप्त्यांमध्ये वितरित केले जाते.
1) पहिला हप्ता – ₹15,000
2) दुसरा हप्ता – ₹70,000
3) तिसरा हप्ता – ₹30,000
4) चौथा हप्ता – ₹5,000
घरकुल योजना 2025 अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळवण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. अनुदानात वाढ केल्यामुळे लाभार्थ्यांना घर बांधण्यास अधिक मदत होईल. येत्या काळात सरकार या योजनेत आणखी सुधारणा करेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.