राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तितकीच त्यांच्या पालकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. खरंतर सध्या 2024-25 हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी सुरू झालेली आहे.
शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जात असून यामुळे सध्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक सुद्धा गडबडीत आहेत. अशातच आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परिक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या शाळकरी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा म्हणजेच फायनल परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे. विशेष बाब अशी की यंदा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या आधी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा टप्प्याटप्प्याने होत होती. पण आता सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून याबाबतचे आदेश सुद्धा जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार वेळापत्रक सुद्धा ठरविण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. त्याची ‘डायट’ किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते. दरम्यान आता आपण इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
कसं राहील वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा पुढील महिन्यात होतील. 05 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत असं होतं की इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार घेत असत.
साधारणता एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत शाळांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असत. तसेचं, या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागल्यासारखीच स्थिती होती. यंदा मात्र परिस्थिती बदलेली आहे.
यावर्षी सर्वच शाळांच्या परीक्षा या एकाच वेळी होणार आहेत व पहिली ते नववीच्या परीक्षा सुद्धा सोबत घेतल्या जाणार आहेत. 5 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान सर्व वर्गांच्या परीक्षा होणार आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांना जवळपास एप्रिल अखेर पर्यंत शाळेत यावे लागणार आहे व त्यानंतर एक मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर होणार आहे. परंतु एक मे रोजी निकाल जाहीर करण्यासाठी नक्कीच मुख्याध्यापकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.