लाडकी बहीण योजना : या महिलांचे हप्ते कायमचे होणार बंद …….

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ladki bahin yojana stopped

नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेऊया राज्यातील लाडकी बहीण योजना मध्ये काही लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार आहे. याविषयी अधिक माहिती आज जाणून घेऊया.

राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. लाडकी बहिण योजनेविषयी पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत.

लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.त्यानुसार अनेक महिलांचे हप्ते कायमचे बंद होणार आहेत जाणून घेऊया सविस्तर माहिती.

लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या अटी, पात्रता आणि निकषांनुसार महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. आता ज्या महिलांचे वय आधार कार्ड प्रमाणे 65 वर्ष पुर्ण झाले आहे अशा महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र राहणार नाही.

शासन निर्णयातील अटीप्रमाणे ज्या महिलांनी वयाचे 65 वर्षे पूर्ण केले आहेत अशा महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि यापुढील हप्ते कायमचे बंद होणार आहे.

लाडकी बहिण योजनेत अनेक महिला अशा आहेत कि त्यांना फेब्रुवारी, मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तरी ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्या महिलांना यापुढे एकही हप्ता या योजनेचा मिळणार नाही. तरी महिलांनी हे लक्षात घ्यावे.

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे वय 21 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा महिलांसाठी नवीन अर्ज सुरू होतील आणि त्याबद्दल अधिकृत माहिती सरकार कडून दिली जाणार आहे.

नवीन अर्ज कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती राज्य सरकार कडून देण्यात आलेली नाही. सध्या ज्या महिलांचे वय 65 वर्षे पूर्ण झाले अशा महिलांचे हप्ते कायमचे बंद करण्यात आले आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.