सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे. देशातील 1.15 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठी भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे.
जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतलेला असून कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून ची प्रलंबित मागणी आता पूर्ण झालेली आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांची आठवा वेतन आयोगासोबतच सेवानिवृत्तीचे वय यामध्ये बदल करावे अशी देखील मागणी होती.
दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. केंद्रीय कर्मचारी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय यामध्ये बदल होणार का ? या आशयाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकार आपल्या कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नसल्याचे स्पष्टीकरण देत पुन्हा एकदा सरकारची भूमिका जाहीर केलेली आहे.
लोकसभेच्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सिंग यांनी असेही म्हटले आहे की कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीमुळे उद्भवलेल्या रिक्त जागा दूर करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. सिंग यांनी सांगितले की, सरकारकडे सरकारी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय यामध्ये बदल होणार का ? याबाबतच्या ज्या चर्चा सुरू होत्या त्यांना आता पूर्णविराम लागेल अशी आशा आहे.
कोणत्याही सरकारी कर्मचार्यांच्या संघटनेने सेवानिवृत्तीच्या वयात बदल करण्याची मागणी केली आहे का, असे विचारले असता, यावरही मंत्री महोदयांनी उत्तर दिलेले आहे. जितेंद्र सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय परिषद (संयुक्त सल्लागार यंत्रणा) कडून याबाबतचा कोणताही औपचारिक प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
सेवानिवृत्तीच्या वयातील केंद्राच्या कर्मचार्यांच्या व सेवानिवृत्तीच्या वयात असमानतेची कारणे या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री सिंग यांनी सांगितले की, हा विषय केंद्र सरकारकडे येत नाही कारण हा विषय राज्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे.
एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलण्याचा सरकारचा कोणताच प्लॅन नाही. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत त्या निरर्थक असल्याचे दिसून येते. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच देशातील 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रातील काही राज्य कर्मचारी वगळता बहुतांशी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढेच आहे.