मित्रांनो राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झालेली असतानाच, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र पुन्हा अवकाळी पावसाच्या छायेत असून, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट अनुभवायला मिळाली. पुढील पाच दिवस विदर्भ तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने गारपीट आणि पावसाचा इशारा दिला आहे.
हवामानात बदल – कारण आणि परिणाम
पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ झाले असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता आवश्यक
पुढील काही दिवस अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील स्थिती
बीड, जालना, संभाजीनगर (औरंगाबाद), धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांत तापमानातील बदलासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतही हलक्याशा पावसाची शक्यता आहे.