नमस्कार,केंद्र आणि राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी निरंतर प्रयत्नशील आहेत. यामुळे महिलांचा समाजातील मान-सन्मान वाढला असून, सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना प्राधान्य मिळत आहे. आज महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहणं नाही. काही क्षेत्रांमध्ये अजून सुधारणा आवश्यक आहे, आणि त्यासाठी शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे.
1) लाडकी बहिण योजना
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळत असून, घरगुती गरजा भागवण्यास मदत होते. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये सकारात्मक आणि समाधानकारक वातावरण आहे.
2) एलआयसी विमा सखी योजना
महिला सक्षमीकरणासाठी एलआयसीने विमा सखी योजना डिसेंबर 2024 मध्ये सुरू केली. या योजनेचा उद्देश महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना एलआयसी एजंट म्हणून तयार करणे आहे. महिलांना प्रशिक्षण कालावधीत आर्थिक मानधन दि
ले जाते.
योजनेचे फायदे
- पहिल्या वर्षी —दरमहा 7,000 रुपये.
- दुसऱ्या वर्षी— दरमहा 6,000 रुपये.
- तिसऱ्या वर्षी—दरमहा 5,000 रुपये.
- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना कमिशन मिळते.
पात्रता
- किमान शिक्षण— दहावी पास.
- वय— 18 ते 70 वर्षे.
- भारतीय महिलांना अर्ज करण्याची संधी.
योजनेचे महत्त्व
विमा सखी योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना शाश्वत रोजगाराची संधी देणे आहे. महिलांना आत्मनिर्भरता आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यास मदत होते. सध्या या योजनेसाठी 50,000 हून अधिक महिलांनी अर्ज केला आहे.
अर्ज कसा करावा?
तुम्ही एलआयसीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता. अर्ज करताना योग्य कागदपत्रे आणि वयोमर्यादा योग्य असल्याची खात्री करा.