मित्रांनो भारतात प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि या आधार कार्डवर आधारित युनिक आयडेंटिटी नंबर हा सर्व शासकीय आणि व्यक्तिगत काम करण्यासाठी महत्त्वाचा भाग बनलेला आहे.आधार कार्ड कोणत्याही नागरिकांसाठी ओळखपत्र म्हणून महत्त्वाचा शासकीय पुरावा मानला जातो.
एकदा आधार कार्ड बनल्यानंतर त्यात कुणीही आपल्या पद्धतीने बदल करू शकत नाही.कारण आधार कार्ड सिस्टम बायोमेट्रिक सिस्टम आहे.एकदा आधार कार्ड बनविल्यानंतर त्याला वेळोवेळी अपडेट करणे जरुरी मानले जाते,मात्र आधार कार्ड हे 10 वर्षानंतर अपडेट होते.
जर 10 वर्षानंतरही आधार कार्ड जर कोणत्या कारणास्तव अपडेट केले नसेल तर आधार कार्ड अवैध ठरते का ? आणि या संदर्भात देशात आधार कार्ड अर्थातच नागरिकांचे युनिक आयडेंटी नंबर तयार करणाऱ्या संस्था यूआयडीएआय {Unique Identity Department Authority Of India} ने या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलेले आहे.या याबाबत आपण जाणून घेऊया
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा ओळखपत्र मानला जातो. तसेच आधार कार्ड च्या आधारे अनेक शासकीय योजना,व शासकीय स्तरावर कागदपत्रे बनविण्यासाठी याचा वापर होतो.बँकिंग, शैक्षणिक आणि इतर सर्व व्यक्तिगत कामे आधारमुळे सुविधाजनक होतात.
आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा शासकीय स्तरावर मिळालेला ओळखपत्र पुरावा म्हणून मानला जातो.मात्र आधार कार्ड बनविण्यासाठी व त्याला अपडेट करण्या संदर्भात आजही विविध गैरसमज पसरलेले आहेत.
जसे की एकदा कोणत्याही व्यक्तीने आधार कार्ड काढले तर समोर काहीच चिंता नाही,आधार कार्ड अपडेट केले किंवा नाही केले तरी काही फरक पडणार नाही,असे गैरसमज असतात.
मात्र असे नसून आधार काढला युआयडीएआय कडून वैधता मुद्दत देण्यात आली आहे.अर्थातच 10 वर्षानंतर त्याला अपडेट करावे लागते.मात्र आधार कार्ड जर अपडेट केला नाही तर ते अवैध सुद्धा होत नाही.
आधार कार्ड अपडेट निर्धारित वेळेत न केल्यास शासकीय आणि खाजगी कामात अडचणी येऊ शकतात,त्यामुळे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे एका प्रकारे गरजेचे आहे.
एकदा आधार कार्ड तयार केले की त्याला 10 वर्षानंतर अपडेट करणे आवश्यक आहे. देशात नागरिकांसाठी आधार कार्ड जारी करणाऱ्या युनिट इडेंटिटी डिपार्टमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया{UIDAI} द्वारे यासंदर्भात नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
यानुसार जर 10 वर्षानंतर आपले आधार आपण अपडेट केले नाही तरीही ते अवैध ठरत नाही. मात्र अनेकदा असे होते की व्यक्तीच्या वयानुसार त्याच्या हाताच्या बोटाच्या ठशात व रेषांमध्ये सूक्ष्म बदल होत असतात. यामुळे संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड वर नमूद बायोमेट्रिक आधारित माहिती अर्थातच बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन साठी अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच वेळोवेळी आधार कार्ड अपडेट करण्याची सूचना UIDAI द्वारे देण्यात येत असते.
मुलांचे आधार कार्ड अपडेट साठी लागत नाही कोणताही शुल्क. महत्वाचे म्हणजे लहान मुलांचे एकदा आधार कार्ड बनवल्यानंतर त्याला निर्धारित वेळेत अपडेट करावे लागतात.
कारण मुलांचे वय वाढत जाते तसे तसे त्यांच्या बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन मध्ये बदल होत जातो. याचे कारण म्हणजे लहानपणी आधार नोंदणी करताना त्यांच्या हातांचे बोटांचे ठसे आणि त्यामध्ये रेघा लहान असतात,मुलांच्या वयानुसार त्या वाढत जातात त्यामुळे 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक असते.
5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी तर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. सरकारकडून या वयोगटातील मुलांचे आधार अपडेट करताना कोणतेही शुल्क वसुली होत नाही, असे आधार अपडेट्स विनामूल्य केले जाते,अर्थातच आपल्या मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर पैसे द्यावे लागण्याची गरज राहत नाही.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेटकरिता नाममात्र रक्कम अदा करावी लागते.भारतीय नागरिकांसाठी सरकार करून आधार कार्ड जारी करण्यात येते.आधार कार्ड हा भारत सरकारने जारी केलेला युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट मानला जातो. याचा वापर नागरिकांचा ओळख पुरावा,रहिवासी पुरावा,वेळोवेळी विविध शासकीय आणि निमशासकीय सेवांसाठी वापर केला जातो.
बँक खाते उघडणे,बँकिंग क्षेत्रासाठी विविध कामे आटोपताना,मोबाईल साठी सिम कार्ड खरेदी करताना, विविध सरकारी अनुदान आणि टॅक्स अदा करण्यासह अनेक ठिकाणी आधार कार्ड अर्थातच युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट हे आवश्यक मानले जाते.