मंडळी राज्य सरकारने रेशन कार्डाला केवायसी (e-KYC) जोडण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. अनेक नागरिकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत असल्यामुळे ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. मात्र यानंतर आणखी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही अंतिम संधी मानली जात आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रेशन कार्डसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. याआधीही वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असून, ही चौथी आणि शेवटची मुदतवाढ आहे. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी 30 एप्रिल 2025 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
जर कोणत्याही कार्डधारकाची केवायसी 30 एप्रिलपर्यंत पूर्ण झाली नाही, तर अशा कार्डधारकांना मोफत किंवा अनुदानित धान्य मिळणे थांबेल. त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता आहे. सध्या राज्यभरात सुमारे पाच लाख रेशन कार्डधारकांची केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने मुदत वाढवली आहे.
केवायसीसाठी नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
ऑफलाइन पद्धतीने केवायसी करण्यासाठी जवळच्या रेशन दुकानात जावे लागते. तिथे रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवून, बायोमेट्रिक मशीनवर बोटांचे ठसे देऊन पडताळणी करावी लागते.
ऑनलाइन केवायसीसाठी Mera KYC आणि Aadhaar Face RD.ही दोन मोबाइल अॅप्स डाउनलोड करावी लागतात. अॅपमध्ये राज्य निवडून आधार क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर चेहऱ्याची ओळख पडताळली जाते आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.
ज्यांनी अजून केवायसी केलेली नाही, त्यांनी ही अंतिम संधी वापरून 30 एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना रेशनवरील लाभ सुरळीत मिळत राहतील.