मंडळी महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते. आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले असून, एप्रिलच्या हप्त्यासाठी लाभार्थी प्रतीक्षा करत आहेत. काही महिलांना हा हप्ता मिळणार नाही.
योजनेच्या लाभासाठी ठरावीक निकष आहेत. ज्या महिला या निकषात बसत नाहीत, त्यांना एप्रिलचा हप्ता दिला जाणार नाही. या निकषांमध्ये पुढील अटी समाविष्ट आहेत:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- घरात चारचाकी वाहन नसावे.
- महिला सरकारी नोकरीत नसावी.
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
ज्या महिलांनी अर्ज केला असला तरी या निकषांत बसत नसतील, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत ९ लाख महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळण्यात आले आहे. मार्च महिन्यात काही अर्ज नाकारण्यात आले असले तरी याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सध्या एप्रिलच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तो एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. उत्पन्न पडताळणी सुरू असल्याने काही महिलांना हप्ता उशिरा मिळू शकतो.
लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेटसाठी अधिकृत घोषणांची वाट पाहावी.