नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिन्याला १,५०० रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी परिवहन विभागाकडून नोंदणी असलेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या आणि लाभ घेतलेल्या महिलांची सखोल पडताळणी सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थिती
अहिल्यानगर जिल्ह्यात १८ ते २० हजार महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या महिलांची तालुकानिहाय पडताळणी करण्यात येत आहे. महिला बालकल्याण विभाग आणि स्थानिक प्रशासन हे या प्रक्रियेत सहभागी आहेत.
नगर जिल्ह्यातील कारवाई
नगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या १२ लाखांहून अधिक आहे. राज्य पातळीवरून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत सुरुवातीला महिलांच्या प्रतिज्ञापत्रावर विश्वास ठेवून लाभ देण्यात आला. परंतु निवडणुकीनंतर सरकारने लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली.
अपात्र लाभार्थ्यांची ओळख
योजनेंतर्गत महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असतील, तर त्या महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात अशा १८ ते २० हजार महिलांची नोंद आढळली आहे. यामध्ये किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, हे तपासल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाईल.
स्वेच्छेने योजना सोडणाऱ्या महिला
दरम्यान जिल्ह्यातील २५० ते ३०० महिलांनी स्वेच्छेने योजनेतून माघार घेत आर्थिक मदत बंद करण्याची विनंती महिला बालकल्याण विभागाकडे केली आहे. पुढील आदेशानुसार प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारने योजना बंद करण्याची कोणतीही घोषणा केलेली नसली तरी अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील खरी गरजू महिलांनाच लाभ मिळेल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.