मित्रांनो नमस्कार हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 1 एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाचीही शक्यता आहे.
तापमान वाढीचा अंदाज
डख यांच्या मते 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित महत्त्वाची कामे या कालावधीत पूर्ण करून घ्यावीत.
अवकाळी पावसाची शक्यता
1 एप्रिलपासून 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विशेषता कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
गहू, कांदा, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या पिकांची काढणी किंवा संरक्षणाची व्यवस्था 31 मार्चपूर्वी पूर्ण करावी, असा सल्ला डख यांनी दिला आहे.
मुंबई आणि कोकणातही पावसाचा अंदाज
गुढीपाडवानंतर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही अवकाळी पावसाचे वातावरण तयार होईल.
डख यांचा हा अंदाज कितपत खरा ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत अंदाजांसाठी त्यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल नक्की भेट द्या.